Politics : किरीट सोमय्या संजय राऊतांच्या निशाण्यावर, युवक प्रतिष्ठान ट्विट करण्याची मालिका सुरु

Continues below advertisement

महाविकास आघाडीतल्या डझनभर नेत्यांवर घोटाळ्याचे आरोप करणारे, आणि अनेकांना मंत्रिपद सोडायला लावणारे किरीट सोमय्या राऊतांच्या निशाण्यावर आहेत. सोमय्या कुटुंबाशी संबंधित युवक प्रतिष्ठानला मिळणाऱ्या निधींबाबत ट्विट करण्याची मालिका राऊतांनी सुरुच ठेवली आहे.. NSEL घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी किरीट सोमय्यांनी केली होती.. या प्रकरणी मोतीलाल ओसवाल कंपनीची ईडीनं चौकशी देखील सुरु केली.. सोमय्या स्वतः कंपनीच्या शिपायाच्या घरी गेले होते.. मात्र २०१८ आणि २०१९ या दोन वर्षांत मोतीलाल ओसवाल कंपनीकडून सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला लाखो रुपयांचा निधी मिळाल्याचा आरोप संजय राऊतांनी केलाय..  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram