Ahmednagar : 'एबीपी माझा' च्या पाणीटंचाईच्या बातमीनंतर इमामपूरमध्ये गावात पाण्याचा टँकर दाखल
Continues below advertisement
Ahmednagar : अहमदनगरच्या इमामपूर गावच्या पाण्याची समस्या एबीपी माझाने दाखविल्यानंतर गावात पाण्याचा टँकर दाखल झाला आहे...इमामपूर गावात सध्या तीव्र पाणी टंचाई आहे... हंडाभर पाण्यासाठी दोन- दोन किलोमीटर पायपीट करण्याची वेळ ग्रामस्थांवर येत होती...ग्रामपंचायतकडून टँकरसाठी प्रस्ताव देखील पाठवण्यात आला होता, मात्र मंजुरी मिळून देखील टँकरच्या डिझेलसाठी निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत टँकरने पाणी पुरवठा होत नव्हता...याबाबत इमामपूर गावाच्या नागरिकांची व्यथा एबीपी माझाने दाखवताच गावात पाण्याचा टँकर आला आहे...दिवसातून गावासाठी चार टँकर पाणी मिळत आहे त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण असून गावचे सरपंच भीमराज मोकाटे यांनी एबीपी माझाचे आभार मानलेत.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv