MCA अध्यपदाच्या निवडणुकीतून Ashish Shelar माघार घेणार, पवार- शेलार पॅनलच्या उमेदवाराबाबत सस्पेन्स
एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीत पवार-शेलार यांच्या संयुक्त पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवणार की ही निवडणूक माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्यासाठी बिनविरोध करणार याविषयीची उत्सुकता अजूनही कायम आहे. मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार हे या निवडणुकीतून आज माघार घेणार हे निश्चित आहे. कारण शेलार बीसीसीआयच्या खजिनदारपदावर बिनविरोध निवडून येणार हे स्पष्ट झालं आहे. त्यामुळं एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून शेलारांनी माघार घेतली की, माजी कसोटीवीर संदीप पाटील यांच्याविरोधात ते अमोल काळे किंवा संजय नाईक या दोघांपैकी कुणाला उभं करणार का हा प्रश्न आहे. काळे आणि नाईक या दोघांनीही अध्यक्षपदासह विविध पदांसाठी अर्ज भरले आहेत. पण संदीप पाटील यांच्या तुलनेत त्या दोघांचीही प्रतिमा खूपच छोटी आहे. त्यामुळं अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत पवार आणि शेलार मिळून काय निर्णय घेतात, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.