
CM Banner NCP : कुणीही येतं, बॅनर लावून जातं! 'त्या' पोस्टरवरुन सुप्रिया सुळे संतापल्या
Continues below advertisement
मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयाबाहेर अज्ञातांकडून पोस्टरबाजी सुरुच आहे... आधी जयंत पाटील नंतर अजित पवार आणि आता सुप्रिया सुळेंच्या नावाने पोस्टरबाजी करण्यात आलीये.. सुप्रिया सुळेंचा पहिल्या महिला भावी मुख्यमंत्री असा उल्लेख असलेला बॅनर लावण्यात आला... यापूर्वी जयंत पाटील आणि अजित पवार यांचाही भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करत पोस्टरबाजी करण्यात आली होती.. हे पोस्टर्स नेमकं कोण लावत आहे.. हे अद्याप कळू शकलेलं नाहीये.... दरम्यान कोणीतरी खोडसाळपणा करत असल्याचं राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाचं म्हणणं आहे... या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात येणार आहे...
Continues below advertisement
Tags :
Jayant Patil Banner Posters Supriya Sule Unknown Ajit Pawar Mumbai State Office NCP Women Future Chief Minister