Anil Jaisinghani:अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक,Amruta Fadnavisयांना ब्लॅकमेल केल्याचं प्रकरण
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appगेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात ज्या महाशयांचं नाव वारंवार घेतलं जातंय.... ज्यांच्या कन्येनं थेट गृहमंत्र्यांच्या पत्नीला लाच देण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांनी तिला बेड्या ठोकल्या...तोच बुकी अनिल जयसिंघानी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय... अनिल जयसिंघानीला गुजरातमधून अटक करण्यात आलीय.... अमृता फडणवीस यांना लाच देण्याचा प्रयत्न तसेच धमकी देणाचा प्रयत्न जयसिंघानी कुटुंबाकडून झाला होता... या प्रकरणी अमृता फडणवीस यांनी तक्रार दाखल केल्यानंतर तपासाची सूत्रे हालली आणि अखेर अनिल जयसिंघानीला मुंबई गुन्हे शाखेने गुजरातमधून अटक केली. जयसिंघांनी शिर्डीमार्गे गुजरातला गेला होता.. तिथंही तो सतत ठिकाणं बदलत होता. आधी बार्दोली, मग सुरत, आणि त्यानंतर गोधरा इथं पळाला. अखेर मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं त्याला कलोलमधून अटक केली. यामध्ये गुजरात पोलिसांची मदतही घेण्यात आली.