Anil Deshmukh Bail :अनिल देशमुख यांच्या जामिनाला १० दिवसांची स्थगिती, सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार

माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या जामिनाला 10 दिवसांची स्थगिती देण्यात आलीये.. सीबीआयने दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उच्च न्यायालयाने देशमुखांना दिलासा दिला. त्यानंतर सीबीआयने न्यायालयाला विनंती करत देशमुखांच्या जामीन अर्जाला स्थगिती देण्याची मागणी केली. न्यायालयाने सीबीआयच्या विनंतीनंतर देशमुखांच्या जामिनाला स्थगिती दिली. त्यामुळे पुढचे 10 दिवस देशमुखांचा मुक्काम हा तुरुंंगातच असणार आहे 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola