Andheri Bypolls : अंधेरी पोटनिवडणूक शिंदे गट लढणार, ऋतुजा लटके मुख्यमंत्र्यांना भेटल्याची चर्चा
Continues below advertisement
नाव आणि चिन्हाच्या लढाईनंतर सध्या राज्यभर चर्चेत असलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत नवीन ट्विस्ट आलाय. मंत्रिपदाची ऑफर देऊन ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांना खेचण्याचा शिंदे गटाचा प्रयत्न आहे असा गंभीर आरोप अनिल परबांनी केलाय. एवढच नव्हे तर मुंबई महापालिकेच्या कर्मचारी असलेल्या ऋतुजा यांचा राजीनामा मंजूर होऊ नये म्हणून दबाव टाकला जातोय, असा आरोप देखील ठाकरे गटानं केलाय. ऋतुजा यांचा राजीनामा तात्काळ मंजूर व्हावा म्हणून ठाकरे गटानं कोर्टात धाव घेतली असून त्यावर आजच सुनावणी होणं अपेक्षित आहे.
Continues below advertisement