CCH Cloud Miner Scam : सोलापुरात CCH घोटाळ्यात अनेकांना गंडा, फसवणुकीचा आकडा 45 लाखांपर्यंत

सोलापुरातील सीसीएच या ऑनलाईन वेबसाईटद्वारे दामदुप्पट पैशांच्या आमिषानं गुंतवणूक केलेल्यांची फसवणूक झालीय. सोलापुरात आतापर्यंत 31 जणांनी तक्रार दिली असून फसवणुकीचा आकडा ४५ लाखांपर्यंत पोहोचलाय. बदनामीच्या भीतीनं अनेक जण अजूनही समोर आले नसल्यानं हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सोलापूरप्रमाणे धुळ्यातही शेकडो लोक या आमिषाला बळी पडले असल्याची शक्यता आहे. सोलापुरात अनंत, जयंत आणि स्मिता येरंकोल्लू या तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola