Andheri Bypolls 2022 : बहुचर्चित अंधेरी पोटनिवडणुकीत 31.74 टक्के मतदान

Continues below advertisement

अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय. सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या या मतदान प्रक्रियेत ३१.७४ टक्के मतदान झालंय.  अंधेरी पूर्वचे आमदार रमेश लटके यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्यानंतर अंधेरीत पोटनिवडणूक लागली. भाजपने ऋतुजा लटकेंविरोधात मुरजी पटेल यांना उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक चर्चेत आली होती. मात्र राज ठाकरेंसह शरद पवारांनी विनंती केल्यानंतर भाजपने अंधेरीच्या मैदानातून माघार घेतली होती. त्यानंतर ऋतुजा लटके यांच्यासमोर सहा अन्य उमेदवारांचं आव्हान आहे. या निवडणुकीचा निकाल ६ नोव्हेंबरला लागणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram