Amit Shah : अजित पवारांच्या एण्ट्रीनं महायुती मजबूत, शाहांच्या बैठकीत आगामी विस्तारावर देखील चर्चा

Continues below advertisement

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल रात्री मुख्य़मंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची तब्बल अडीच तास बैठक घेतली. रात्री १० ते साडे बारा या दरम्यान ही बैठक पार पडली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील उपस्थित होते. या बैठकीत नेमकं काय घडलं त्याची माहिती माझाच्या हाती लागली आहे. अजित पवार सरकारमध्ये आल्यामुळे निवडणुकीसाच्या दृष्टीनं महायुती आणखी मजबूत झाली आहे, असं शाह बैठकीत म्हणाल्याचं समजतंय. बैठकीत सर्वात आधी आगामी मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा झाली, त्यानंतर २०२४मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीवर देखील सविस्तर चर्चा पार पडली. महत्त्वाचं म्हणजे एक-एक करून सर्व ४८ लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यात आला. विशेष म्हणजे या आढाव्याची सुरुवात पश्चिम महाराष्ट्रातील जागांपासून झाली. बारामती मतदारसंघ देखील पश्चिम महाराष्ट्राच येतो, याची आठवण इथं करून देणं संयुक्तिक ठरेल. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram