Nagpur Nasa Job Fraud : नासामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून 111 जणांना गंडा ; 5 कोटींची फसवणूक
Continues below advertisement
Nagpur Nasa Job Fraud : नासामध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून 111 जणांना गंडा ; 5 कोटींची फसवणूक 'नासा' मध्ये नोकरी देण्याचं आमिष दाखवून फसवणूक करणारा ठगबाज ओमकार तलमले याच्यावर मोक्का लागण्याची शक्यता आहे. ओमकारनं तब्बल 111 जणांची फसवणूक केलीये, त्यातील ३३ जणांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे.
एवढंच नाही तर या भामट्यानं नागपुरातील दोन व्यापाऱ्यांचं अपहरण करून त्यांची हत्याही केली होती. या हत्याप्रकरणात त्याला अटक झाल्यावर त्यानं केलेल्या फसवणुकीचे कारनामे समोर आले होते. त्यामुळे दुहेरी हत्याकांड, आर्थिक फसवणूक हे गंभीर गुन्हे बघता नागपूर ग्रामीण पोलीस ओमकारवर मोक्का लावणार असल्याची माहिती दिलीये. .
Continues below advertisement