Ambadas Danve : शासन आपल्यादारी कार्यक्रमातून पैशांची उधळपट्टी , सरकारी कर्मचाऱ्यांचे कापले पगार
Continues below advertisement
शासन आपल्या दारी या माध्यमातून सरकारी पैशाची उधळपट्टी करण्यात येतं आहे. जाहिरात बाजीवर सरकार मोठ्या प्रमाणात खर्च करत आहे. त्यामुळं प्रत्येक्षात जनतेच्या पदरात काहीच पडत नाही.. अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलीय. अनेक ठिकाणी विहिरीचे पैसे मिळाले नाहीत, गोठ्याचे पैसे मिळाले नाहीत, मंजुरीच्या फाईली कित्येक दिवस पेंडिंग आहेत. तसंच सरकारी अधिकारी, कर्मचारी यांचा एक दिवसाचा पगार कापल्याचा आरोप अंबादास दानवे यांनी केलाय. महाराष्ट्राचं शासन मुख्यमंत्र्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या दारावर नेऊन टाकलंय. अशी टीकाही विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंनी केलीय.
Continues below advertisement