Ambadas Danve On Pankaja Munde : कारवाईसाठी पंकजा मुंडेंचाच कारखाना कसा भेटला? : ABP Majha

Continues below advertisement

भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांच्या ताब्यात असलेल्या परळीतल्या वैद्यनाथ सहकारी कारखान्यावर काल जीएसटीचे अधिकारी धडकल्यानं महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.वैद्यनाथ सहकारी कारखान्यात तयार झालेली साखर कोरोना काळात व्यापाऱ्यांना विकण्यात आली. पण त्याचा जीएसटी केंद्र सरकारकडे भरण्यात आला नव्हता. त्यामुळं जीएसटी अधिकारी थेट वैद्यनाथ कारखान्यात पोहोचले आणि पंकजा मुंडेंच्या कारखान्यावर कारवाई होणार अशी चर्चा सुरू झाली. जीएसटी विभागानं छापा टाकल्यानंतर या कारखान्याची काही कागदपत्रं ताब्यात घेण्यात आली आहेत. जीएसटी विभागाचे आठ ते दहा अधिकारी या प्रकरणी चौकशी करत आहेत. प्राथमिक माहितीनुसार १६ कोटी रुपयांचा जीएसटी भरला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वैद्यनाथ कारखान्यात सलग दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांकडून तपास करण्यात आला.  स्वत:च्या पक्षाचे लोक डोईजड होतील म्हणून ही कारवाई होतेय का अशी शंका  ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी उपस्थित केलीए 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram