Akola ZP | अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक, आंबेडकर सत्ता राखणार? | ABP Majha
अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत प्रकाश आंबेडकर यांची भारिप बहुजन महासंघाला सत्तेपासून दूर राहणार आहे. भारिपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपला महाविकासआघाडीची साथ लाभलीय. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापण्यासाठी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येणार आहेत. अध्यक्षपदासाठी काँग्रेसचे सुनिल धाबेकरांचा उमेदवारी अर्ज तर उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेच्या गोपाल दातकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झालाय. भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे एका अपक्षासह 28 इतकं संख्याबळ आहे.