Ajit Pawar on Chhagan Bhujbal : भुजबळ नाराज नाहीत, अजित पवारांचं स्पष्टीकरण
नाशिकच्या जागेवर लोकसभा लढवण्यासाठी उत्सुक असलेल्या भुजबळांना राज्यसभेचीही उमेदवारी न मिळाल्यानं ते नाराज असल्याची चर्चा होती.. अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून राज्यसभेसाठी छगन भुजबळ इच्छुक होते.. मात्र त्याना डावल्यावर ते नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. यावर आता अजित पवारांनी भाष्य केलंय. भुजबळ नाराज नसल्याचं अजित पवारांनी स्पष्ट केलंय. तर ऑर्गनायझरमधील लेखातल्या टीकेला अजित पावारंनी उत्तर देणं टाळलंय.
हे देखील वाचा
Nilesh Lanke : गजा मारणेची भेट हा केवळ अपघात, त्याची पार्श्वभूमी मला माहिती नव्हती; निलेश लंकेंचे स्पष्टीकरण
पुणे : गुंड गजा मारणेची भेट घेतल्यानंतर निलेश लंके (Nilesh Lanke Meet Gaja Marne) यांच्यावर टीकेचा भडीमार सुरू झाल्यानंतर लंके यांनी आता त्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. गजा मारणे याच्याशी झालेली भेट हा केवळ अपघात होता, मला त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती असं निलेश लंके यांनी स्पष्ट केलंय.
अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी कुख्यात गुंड गजा मारणे याची भेट घेतली. लंकेंची ही भेट त्यांना अडचणीची ठरल्याचं दिसून येतंय. खासदार निलेश लंकेंनी गुरुवारी कुख्यात गुंड गजा मारणेच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. गजा मारणेने निलेश लंकेंचा सत्कार केला. निलेश लंके यांनी त्याच्याकडून सत्कारही स्वीकारला आहे. यामुळे यावरुन राष्ट्रवादीचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी त्यांच्यावर टीका केली.