Irrigation Scam | सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना क्लीन चिट | ABP Majha
Continues below advertisement
बहुचर्चित सिंचन घोटाळाप्रकरणी अजित पवार यांना क्लीनचीट देण्यात आली आहे. सिंचन प्रकल्पांमध्ये कोणतेही नियमबाह्य व्यवहार झाले नसल्याचं स्पष्टीकरण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) अहवालात देण्यात आलं आहे. मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात एसीबीने शपथपत्र सादर केले आहे. या शपथपत्रात अजित पवारांविरोधात कोणतीही फौजदारी कारवाई करण्यात येणार नाही असं नमूद करण्यात आलंय. याआधीच्या शपथपत्रात अजित पवारांनी 134 कोटी रुपयांचा मोबलायझेशन अॅडव्हान्स बेकायदा मंजूर केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मात्र नव्या शपथपत्रात हा दावा खोडून काढण्यात आला आहे.
Continues below advertisement