ABP News

Ahmednagar : गाळपेर क्षेत्रातील शेतीला मोठा फटका, असंपादित जमिनीवर पाणी भरल्याचा दावा

Continues below advertisement

नाशिक (Nashik) आणि परिसरात झालेल्या दमदार पावसामुळे जायकवाडी धरण सलग चौथ्या वर्षी पूर्ण क्षमतेने भरणार हे निश्चित आहे. मात्र यामुळे सध्या नगरच्या शेवगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांची गाळपेर जमिनीतली पिकं पाण्याखाली गेली आहेत.. या भागात असंपादित जमिनीतल्या पिकांचंही यंदा पुन्हा नुकसान झालंय... मागील तीन वर्षांपासून धरण पूर्ण भरतंय.  त्यामुळे धरणालगतच्या दहिगावने, घेवरी, भावीनिमगाव, शहरटाकळी, ढोरसडे, हिंगणगाव या गावांतील शेतकऱ्यांच्या असंपादित शेतातही पाणी येऊन पिकांचे मोठे नुकसान झाले त्यामुळे या शेतकऱ्यांनी सरकारकडे नुकसानभरपाईची मागणी केलेय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram