Aaditya Thackeray :राजकारणाची गलिच्छ परिस्थिती,डबल झालेल्या इंजिनाला अजून एक चाक लागलं-आदित्य ठाकरे

एकनाथ शिंदेंच्या बंडाला वर्ष झाल्यानंतर राज्यात आणखी एक राजकीय भूकंप झालाय. अजित पवारांनी काही आमदारांना हाताशी घेत सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. अजित पवार आणि आठ आमदारांनी राजभवनावर आज मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा केला. शरद पवार आणि जयंत पाटील यांनी या पाठिंब्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा नसल्याचे सांगितले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचे निश्चित झाले. राष्ट्रवादीचा पक्ष शरद पवार आणि  अजित पवार या काका-पुतण्यामध्ये विभागला गेल्याचं स्पष्ट झाले.... यानंतर यासंपूर्ण परिस्थितीवर आदित्य ठाकरेंनी देखील प्रतिक्रिया दिलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola