Special Report : अजितदादांकडून आदित्य ठाकरेंच्या कामाचं कौतुक
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघाचा दौरा केला.वरळीत आदित्य ठाकरे आणि अजित पवार यांच्याकडून विकासकामांची एकत्र पाहणी करण्यात आली.मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आदित्य ठाकरे यांनी मुंबईत वेगवेगळ्या प्रकल्पांच्या उद्घाटनाचा धडाका लावला आहे.' पुढे चला मुंबई' अशी घोषणाही त्यांनी दिली आहे. या पार्श्वभूमीवर पवार-ठाकरेंच्या या दौऱ्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.