Mumbai : रोखठोकमध्ये संजय राऊत यांनी सांगितला Aditya Thackeray-Mamata Banerjee भेटीचा किस्सा

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचं कौतुक केलंय. ममता बॅनर्जी यांनी नुकताच मुंबई दौरा केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे रुग्णालयात असल्याने आदित्य ठाकरे यांनी ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी ममता बॅनर्जी यांनी आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबईत बंगाल भवन उभारण्यासाठी भूखंड मिळावा अशी मागणी केली. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रोखठोक सदरात ही माहिती दिलीय. पर्यटनमंत्री म्हणून आदित्य ठाकरे यांच्या कामाचंही दीदींनी कौतुक केल्याचं राऊत यांनी रोखठोकमध्ये नमूद केलंय. तसंच आदित्य ठाकरे यांना निरोप देण्यासाठी ममता बॅनर्जी हॉटेलच्या लिफ्टपर्यंत आल्याचा किस्साही राऊत यांनी सांगितलाय.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola