Ajit Pawar | सिंचन घोटाळ्याप्रकरणी अजित पवार यांना एसीबीकडून क्लीन चिट | ABP Majha

महाराष्ट्रातील बहुचर्चित 72 हजार कोटी रुपयांच्या सिंचन घोटाळ्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना क्लीन चिट मिळाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. यात अजित पवारांना क्लीन चिट देण्यात आली आहे. एसीबीचे पोलिस महासंचालक परमबीर सिंह यांनी हायकोर्टात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, तत्कालीन मंत्री अजित पवारांविरोधात फौजदारी कारवाई करण्याची गरज नाही. आयपीएस अधिकारी संजय बर्वे यांनी पहिलं आरोपपत्रात कोणत्याही पुराव्याशिवाय दाखल केलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola