ABP Majha Headlines 7AM एबीपी माझा हेडलाईन्स 07 AM 22 July 2024 Marathi News
मुंबईत आज पावसाचा यलो अलर्ट, काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज
कोल्हापुरातील पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल, जिल्ह्यातले ८४ बंधारे पाण्याखाली, पूरस्थिती पाहून शाळा सुरु ठेवण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना
पूर्व विदर्भाला पावसानं झोडपलं..मुसळधार पावसामुळे नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, भंडाऱ्यातील शाळा, काॅलेजला आज सुट्टी, मुसळधार पावसाचा इशारा
अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा आजपासून, आर्थिक पाहणी अहवाल आज सादर करणार, तर अर्थमंत्री निर्मला सीतारमण उद्या सादर करणार अर्थसंकल्प
ओबीसींच्या आरक्षण बचावासाठी आजपासून ओबीसींची लक्ष्मण हाकेंच्या नेतृत्त्वात जनआक्रोश यात्रा, कायदा सुव्यवस्थेचं उल्लंघन केल्यास कारवाई करण्याची पोलिसांची नोटीस
शरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून विधानसभेचं रणशिंग फुंकताना शाहांचा हल्लाबोल, पद्म पुरस्काराची आठवण करून देत सुप्रिया सुळेंचा पलटवार
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला होणाऱ्या विरोधावर बोट ठेवत टीकेचे बाण
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढणार, अजित पवारांची पुण्यात मोठी घोषणा, मात्र विधानसभा महायुतीतच लढणार, अजितदादांची स्पष्टोक्ती.
नीटसंदर्भातील याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी, पेपरफुटीसंदर्भात बिहार पोलीस आणि सीबीआयने आतापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल सादर करण्याचे आदेश