ABP Majha Headlines : 6 PM : 24 October 2024 : एबीपी माझा 6 च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

अडीच तासांपासून शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची अमित शाहांसोबत खलबतं. बंडखोरी टाळण्याची चाणक्यांची सूचना, दुसऱ्या टप्प्यातील जागावाटपावर चर्चा
जागावाटपात सेंच्युरी मारण्याचा ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसचा दावा, मविआतील तिन्ही पक्षांना ८५ पेक्षा जास्त जागा मिळणार, नाना पटोलेंची माहिती
महाविकास आघाडीत काँग्रेस आणि ठाकरे पक्षांत काही जागांवर अद्यापही घासाघीस.. वर्सोवा, भायखळा जागेसाठी वर्षा गायकवाड, अस्लम शेख मातोश्रीवर... विदर्भातल्या जागांसाठी सुनील केदारही मुंबईत..
छगन भुजबळांचे पुतणे समीर भुजबळांकडून बंडाचं निशाण, नांदगावमधून सुहास कांदेंविरोधात अपक्ष म्हणून मैदानात, अजितदादांच्या राष्ट्रवादीचा राजीनामा
निष्ठेचं फळ अजय चौधरींच्या पारड्यात, मुंबईतल्या शिवडी मतदारसंघासाठी उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म, लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर दळवी होते शर्यतीत
आदित्य यांचा उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे कुटुंबाची उपस्थिती, पवारांच्या उपस्थितीत आव्हाडांची रॅली, अर्जाच्या निमित्तानं मविआच्या नेत्यांचं जोरदार शक्तीप्रदर्शन
अर्ज भरण्यापूर्वी अनेक नेत्यांचं देवदर्शन, चंद्रकांत पाटील, राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह महायुतीच्या अनेक नेत्यांकडून अर्ज दाखल, 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram