Abdul Sattar :कुणी आरे केलं तर कारे करा आणि एक मारली तर 4 मारा कृषी मंत्री अब्दुल सत्तारांचा सल्ला
कुणी आरे केलं तर कारे करा आणि एक मारली तर 4 मारा असा सल्ला कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी त्यांच्या समर्थकांना दिलाय.. परभणीतल्या मेळाव्यात सत्तारांनी केलेल्या या चिथावणीखोर वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.. मंत्र्यांनी कार्यकर्त्यांसमोर असं भाषण करणं योग्य आहे का असा प्रश्न देखील आता विचारला जातोय..