Abdul Sattar Home Security : वादग्रस्त वक्तव्यानंतर अब्दुल सत्तार यांच्या घराला सुरक्षा

Abdul Sattar Home Security : कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राज्यभरामध्ये अजूनही निषेध मोर्चा राष्ट्रवादीकडून होताना पाहायला मिळतोय. सत्तार यांच्या  शासकीय निवासस्थानाच्या बाहेर आज पुन्हा एकदा पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आलाय. पोलिसांच्या जवळपास चार ते पाच गाड्या तैनात केल्या आहेत आणि शासकीय निवासस्थानाचा गेट बंद केलेला आहे. पुन्हा एकदा अब्दुल सत्तार यांच्या निवासस्थानाबाहेर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची आंदोलन होण्याची पोलिसांना शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी बंदोबस्त वाढवलाय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola