Aaditya Thackeray PC Vedanta foxconn: आदित्य ठाकरे यांचं CM Eknath Shinde यांना खुलं आव्हान
महाराष्ट्रातील फॉक्सकॉन प्रकल्प बाहेर जाण्यावरून आदित्य ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिंदे फडणवीस सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. महाविकास आघाडी सरकारमुळे फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर गेल्याचे आरोप केले जात असताना २९ ऑगस्टला एमओयू सायनिंगसाठी बैठक का घेण्यात आली असा सवाल आदित्य ठाकरेंनी केलाय. आदित्य ठाकरेंनी ५ सप्टेंबरच्या एमआयडीसी-वेदांताच्या पत्राचा हवाला देत कोणत्या बैठकीत प्रकल्प गेला याबाबत माहिती दिलीय.. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फॉक्सकॉन प्रकल्प राज्याबाहेर जाण्याबाबत समोरासमोर चर्चा करावी असं आव्हानदेखील आदित्य ठाकरेंनी शिंदेंना दिलंय.