Aaditya Thackeray Full Speech Shahpur : आदित्य म्हणाले, परत या, कार्यकर्ते म्हणाले नको, नको!

Continues below advertisement

Aaditya Thackeray : खाऊन ज्यांना अपचन झाले ते लोक शिवसेनेतून बाहेर पडले आहेत. शिंदे गटानं केलेलं बंड नाही तर ही गद्दारी असल्याचा निशाणा युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी लगावला. आपल्याला राजकारण जमलं नाही हेच चुकलं असल्याचे ते म्हणाले. जिथे गेलात तिथे आनंदात राहा. तुम्ही गेलात म्हणून आम्हाला राग नाही पण दु:ख आहे. चांगल्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला याचं दु:ख आहे. तुमच्यात जर हिंमत असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोर जा असे आव्हान देखील आदित्य ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना दिलं. ज्यांना ज्यांना परत यायचे असेल त्यांच्यासाठी मातोश्रीचे दरवाजे सदैव उघडे असल्याचेही ते म्हणाले. हे सरकार घटनाबाह्य असून लवकरच कोसळणार असल्याचेही आदित्य ठाकरे म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram