Maharashtra Vs Karnataka : अमित शाहांची भेट घेतल्यानं काहीही होणार नाही, बसवराज बोम्मई पुन्हा बरळले

Continues below advertisement

महाराष्ट्र - कर्नाटक सीमावाद थांबण्याचे नाव घेत नाही. या वादात कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई अधिक भर घालत असल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्मई पुन्हा बरळलेत.  महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काहीही फरक पडत नाही. कर्नाटक सरकार सीमाप्रश्नावर कोणतीही तडजोड करणार नाही, असं बोम्मई म्हणाले. सोमवारी कर्नाटकचे खासदार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहेत. राज्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी बोम्मईही लवकरच केंद्रीय गृहमंत्र्यांची भेट घेणार आहेत.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram