MVA Mumbai Morcha : मुंबईत मविआचा महामोर्चासाठी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते येणार
abp majha web team
Updated at:
17 Dec 2022 10:08 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
MVA Mumbai Morcha : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) वतीनं आज मुंबईत महामोर्चा (Morcha) काढण्यात येणार आहे. भायखळ्यातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. रिचर्ड्स अँड क्रूडास मिलपासून सकाळी 10.30 वाजता या मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चासाठी सुमारे अडीच हजार पोलिसांचा बंदोबस्त करण्यात येणार आहे.