Maharashtra Monsoon Session : गोविंदा, ज्येष्ठ नागरिक ते सरकारी कर्मचारी; सरकारचे 3 मोठे निर्णय
राज्याच्या मंत्रिमंडळात मोठे निर्णय घेण्यात आले..
त्यातला पहिला निर्णय हा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी घेण्यात आला.... राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना वाढीव ३ टक्के महागाई भत्ता देण्यात येणार आहे... वाढीव महागाई भत्ता ऑगस्टपासून लागू होणार आहे....कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता ३१ वरुन 34 टक्के होणार आहे. तर दुसरी मोठी बातमी गोविंदांसाठी.... उद्या दहीहंडी उत्सव असून राज्यातल्या नोंदणीकृत दहिहंडी पथकांतील गोविंदांना १० लाखांचं विमाकवच जाहीर करण्यात आलंय.. विमा संरक्षणाचे प्रीमियम शासनाकडून भरण्यात येणार आहे, तिसरी मोठी बातमी राज्यातील सर्व ज्येष्ठांसाठी.... स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त वयाची 75 वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना राज्य परिवहन सेवेच्या बसेस मधून मोफत प्रवास करता येणार आहे,....