Bappa Majha 2020 | उल्हासनगरात पोलिस आणि डॉक्टरांच्या वेशातला कोविड वॉरिअर बाप्पा! बाप्पा माझा
उल्हासनगरच्या वसीटा वीर तरुण मित्र मंडळाने पोलिस आणि डॉक्टरांच्या वेशातला कोविड वॉरिअर बाप्पा साकारलाय. कोरोनापासून वाचवण्यासाठी जनजागृतीपर देखावासुद्धा या मंडळाने साकारलाय. मास्क आणि सॅनिटायझरचा वावर करा, सोशल डिस्टनसिंग पाळा, स्वच्छता राखा असे संदेश या देखाव्यातून देण्यात आले. सोबतच खरे कोरोना योद्धा असलेल्या डॉक्टर्स आणि पोलीस यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त व्हावी आणि त्यांच्या कार्याचा सन्मान व्हावा, या हेतूनं बाप्पाची मूर्तीसुद्धा डॉक्टर आणि पोलिसांचा वेश परिधान करून विराजमान झाली आहे. डॉक्टर्स आणि पोलिसांना या कोरोनाच्या लढ्यात खरोखर देवाचं स्थान असल्याचा संदेश यातून देण्यात आलाय. मागील 40 वर्षांपासून या मंडळाकडून दरवर्षी सामाजिक विषयांवर देखावे सादर केले जातात.
Tags :
Bappa Majha 2020 Lord Ganesha Ganesh Utsav 2020 Ganesh Utsav Bappa Majha Ganesha Ganpati Bappa Ganeshotsav 2020