Final Year Exam | अंतिम वर्षाची परीक्षा कमी गुणांची,घरातूनच पेपर देता येणार, 10नोव्हेंबरपर्यंत निकाल
Continues below advertisement
मुंबई : विद्यार्थी घराबाहेर पडून परीक्षा देणार नाहीत यावर आम्ही ठाम आहोत. यावर सर्व विद्यापीठांच्या कुलगुरुंचं एकमत आहे. बहुतांश विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षेसाठी मुदतवाढ मागितली आहे. यासंदर्भात परवा (2 सप्टेंबर) आपत्कालीन व्यवस्थापनाची बैठक लावून मुदतवाढीसाठी यूजीसीकडे विनंती करणार आहोत, अशी माहिती राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. "कोरोनाच्या संकटात विद्यार्थ्यांना कमी त्रास देऊन घरातल्या घरात परीक्षा देता येईल, यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत," असं सामंत म्हणाले
Continues below advertisement
Tags :
ATKT ATKT Exam Final Year Exam University Exam Bhagatsingh Koshyari Maharashtra Governor Uday Samant Pune