Pune #Corona पुणे मनपाचे 13कर्मचारी कोरोनामुळे दगावले, बेड न मिळाल्याने 11सफाई कर्मचाऱ्यांचा मृत्यू
पुणे शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या महानगरपालिकेच्याच 13 कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यामध्ये 11सफाई कर्मचारी आहेत. पण दुर्दैव असं की पुणे शहराच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या पालिकेच्या या कर्मचाऱ्यांनाही कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर रुग्णालयात बेड मिळवण्यासाठी वणवण भटकावं लागलं. त्यामुळे पालिकेच्या कर्मचाऱ्यांसाठी एक वेगळं कोविड रुग्णालय उभारावं अशी मागणी पुणे महानगरपालिकेच्या कामगार युनियनने केली आहे.