PM Modi | पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक,तर गुलाम नबी आझाद यांना निरोप देताना अश्रू अनावर

नवी दिल्ली : राज्यसभेत आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांच्यासह राज्यसभेतील चार सदस्यांचा कार्यकाळ संपत आहे. या सदस्यांना सभागृहात निरोप देण्यात आला. गुलाम नबी आझाद यांच्यासोबतच्या आठवणी सांगताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.

दहशतवादी हल्ल्यानंतरचा गुलाम नबी यांच्याबद्दलचा अनुभव सांगताना मोदी म्हणाले, दहशतवादी हल्ल्यानंतर आझाद यांनी मला फोन केला आणि ते फोनवर खूप रडले. त्यावेळी मी गुजरातचा मुख्यमंत्री होतो. आझाद यांच्याशी माझे कायम मैत्रीचे नाते आहे. राजकारणात आम्ही ऐकमेकांवर टीका केला परंतु त्यांच्याविषयी माझ्या मनात कायमच आदर आहे.

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola