NITI Aayog | 'ब्लू इकॉनॉमी'मध्ये विकासाच्या अपार संधी, नीती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधानांचे वक्तव्य
नवी दिल्ली: 'ब्लू इकॉनॉमी' म्हणजे मत्स्य व्यवसायामध्ये भारतासाठी व्यापाराच्या आणि विकासाच्या अपार संधी असल्याचं वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलंय. ते नीती आयोगाच्या सहाव्या बैठकीत बोलत होते. व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत राज्यांचे मुख्यमंत्री, सर्व केंद्र शासित प्रदेशाचे प्रशासक, नीती आयोगाचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.