सामान्य नागरिकाप्रमाणे मोदींची रकाबगंज गुरुद्वाराला भेट, गुरू तेगबहादूर यांच्या समाधीसमोर नतमस्तक

नवी दिल्ली: गेल्या सहा वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींनी अनेक सरप्राईज दिले आहेत. रविवारीही त्यांच्या अशाच एका सप्राईज भेटीची चर्चा सुरु झाली. अगदी सामान्य नागरिकाप्रमाणे पंतप्रधान मोदी अचानक दिल्लीतल्या गुरुद्वारा रकाबंगजमध्ये पोहचले. इथं शीखांचे गुरु तेगबहादूर यांची समाधी आहे. मोदी त्या समाधीसमोर नतमस्तक झाले. एकीकडं दिल्लीतल्या शेतकरी आंदोलनात शीख समुदाय सर्वात अग्रस्थानी आहे. त्या पार्श्वभूमीवर मोदी या भेटीतून काय संदेश द्यायचा प्रयत्न करतायत याची चर्चा सुरु झालीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola