मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसचा स्वबळाचा नारा, प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान यांची माहिती
Continues below advertisement
मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने कंबर कसली आहे. निवडणुकीला सव्वा वर्ष बाकी असताना काँग्रेसने मुंबई काँग्रेसचा चेहरा मोहरा बदलला असून पक्षातील सर्वांना जबाबदारी दिली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत काँग्रेसने स्वबळाचा नारा दिला असल्याचे प्रचार समितीचे प्रमुख नसीम खान एबीपी माझाशी बोलताना स्पष्ट केलं आहे. राज्यातील सरकार किमान समान कार्यक्रम आधारित आहे. भाजप सत्तेत असताना पण भाजप आणि सेना विरोधात लढले होते. त्यामुळे आम्ही वेगळे लढलो तरी सरकारवर परिणाम होणार नसल्याचे नसीम खान यांनी सांगितले.
Continues below advertisement