Phone Pe Fraud | मुलाच्या हातात मोबाईल देणं पडलं महागात, अकाऊंटमधून 8 लाख 95 हजार रुपये लंपास

Continues below advertisement
नागपूर : जर तुमच्या मोबाईलमध्ये आर्थिक व्यवहार करणारे अॅप आहेत आणि तुमचे बँक खाते त्या अॅपशी जोडलेले आहे. तर तुमचा मोबाईल तुमच्या मुलांच्या हातात देताना दहा वेळा विचार करा. कारण नागपुरात एका कुटुंबाला त्याची मोठी किंमत मोजावी लागली आहे. पंधरा वर्षीय मुलाने वडिलांच्या मोबाईल फोनमधील 'फोन पे' अॅपची ट्रान्झॅक्शन लिमिट वाढवण्याचा प्रयत्न केला आणि गुगलवरुन 'फोन पे' अॅपची चुकीची लिंक वापरल्यामुळे तो ऑनलाईन ठकांच्या जाळ्यात अडकला. चाणाक्ष ठकांनी त्याच्या वडिलांच्या अकाऊंटमधून तब्बल 8 लाख 95 हजार रुपये लंपास केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram