#KanganaRanaut चं ट्विटर अकाऊंट बंद करण्याची मुंबई हायकोर्टात याचिका, याचिकेला राज्य सरकारचा विरोध
Continues below advertisement
मुंबई : कंगना रणौतचं ट्विटर अकाऊंट कायमचं बंद करण्यासाठी हायकोर्टात आलेल्या याचिकेला राज्य सरकारनं जोरदार विरोध केला आहे. ही याचिका बिनबुडाची आणि त्यातील मागण्या अयोग्य असल्याचा राज्य सरकारचा दावा आहे. ट्विटर ही एक सोशल मीडिया साईट असून त्यावर कुणी काय पोस्ट करावं यावर त्यांचं थेट नियंत्रण नसतं. त्यामुळे जर त्यावरील मजकूरावर आक्षेप असेल तर त्यासाठी तक्रार देण्याचे पर्याय उपलब्ध आहेत. एखाद्या नागरीकाचं अकाऊंट रद्द करण्याचे आदेश थेट राज्य सरकार देऊ शकत नाही, अशी भूमिका सरकारी वकिलांनी मांडली. गुरूवारच्या सुनावणीत कंगना आणि ट्विटरकडनं मात्र कुणीही हजर झालं नव्हतं.
Continues below advertisement