आधी 500 रुपये द्या मग बाळ घेऊन जा, प्रसूती झालेल्या महिलेची रुग्णालयाकडून अडवणूक,बुलडाण्यातील प्रकार

Continues below advertisement
सरकारी रूग्णालयात होणाऱ्या दुर्लक्षामुळे रूग्णांना अनेकवेळा मरणयातना सोसाव्या लागतात. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथील ग्रामीण रूग्णालयातही असेच संतापजनक प्रकार सलग दोन रात्रीत घडले आहेत. कामचुकारपणाचा कळस व पैशाच्या लालसेपायी प्रसुतीपश्चात केवळ पाचशे रूपयांसाठी नवजात बाळ मातेच्या स्वाधीन करण्यास अडवणूक करण्याची घटना १९ डिसेंबरच्या रात्री घडली. तर २१ डिसेंबरच्या रात्री प्रसव वेदनेने विव्हळणाº महिलेकडे साफ दूर्लक्ष केल्या गेले. नाईलाजाने गरोदर महिलेची प्रसुती तिच्या आईला करावी लागली. या स्थितीतही सुमारे हजार रूपये उकळण्यात  आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram