Panjabrao Dukh : परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख यांनी भरला वंचितकडून उमेदवारीचा अर्ज
Panjabrao Dukh : परभणी लोकसभा मतदारसंघातून पंजाबराव डख यांनी भरला वंचितकडून उमेदवारीचा अर्ज परभणी लोकसभेत नवा ट्विस्ट आलाय. परभणीत वंचितने ऐनवेळी उमेदवार बदललाय. बाबासाहेब उगले यांच्याऐवजी पंजाबराव डख यांना उमेदवारी देण्यात आलीय. पंजाब डख यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. परभणीतून वंचितने बाबासाहेब उगलेंना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐनवेळी त्यांच्याऐवजी पंजाबराव डख यांनी अर्ज दाखल केलाय. पंजाबराव डख हे हवामान अभ्यासक आहेत.