Godavari River Parbhani : परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार; गोदावरी पडली कोरडी

Continues below advertisement

Godavari River Parbhani : परभणी नगर परिषदेचा ढिसाळ कारभार; गोदावरी पडली कोरडी

छत्रपती संभाजीनगर : यावर्षी राज्यातील अनेक भागात अपेक्षित पाऊस (Rain) झाला नसल्याने दुष्काळ (Drought) सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे, मराठवाड्यातील (Marathwada) दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक येणार आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचे पथक राज्यातील दुष्काळ व खरीप नुकसानीचा आढावा घेण्यासाठी मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्याचा दौरा करणार आहे. 13 व 14 डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची केंद्रीय पथक पाहणी करणार आहे. ज्यात, छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhaji Nagar), जालना (Jalna), बीड (Beed) आणि धाराशिव (Dharashiv) जिल्ह्यांतील काही तालुके व गावांना हे पथक भेट देणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच पाहणी केल्यावर 15 डिसेंबर रोजी पथक पुण्यात बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला देईल. विशेष म्हणजे, केंद्रीय कृषी विभागाच्या सहसचिव प्रिया राजन या पथकप्रमुख असणार आहे. 

मराठवाड्यात यंदा अपेक्षित पाऊस झाला नसल्याने आठही जिल्ह्यातील अनेक भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती पाहायला मिळत आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे. त्यातच उरल्यासुरल्या पिकांचे अवकाळी पावसामुळे नुकसान झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारप्रमाणेच केंद्र सरकराने देखील मदत करण्याची मागणी केली जात होती. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर आता केंद्रीय पथक मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांचा दौरा करून नुकसानीची पाहणी करणार आहे. त्यानंतर हे पथक पुण्यात एक बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाला पाठवणार आहे. त्यामुळे, केंद्रीय पथकाच्या दौऱ्यानंतर दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांना काय मदत मिळणार हे पाहणं महत्वाचे असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram