Vasai Virar Water Logging : वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस, रस्त्यांना आलं नदीचं रुप ABP Majha
Continues below advertisement
वसई-विरारच्या नालासोपारा शहरात काल दिवसभर पावसाने हाहाकार माजवला होता. आजही सकाळपासून वसई विरारमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे.. वसईच्या मधुबन परिसरातही पाणी साचलंय. तर विरार पश्चिमेकडील आगाशी रोड पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे. रस्यावर पाणीच पाणी दिसत आहे. राञी विरारच्या अर्नाळा खाडीचा पाडा, कातकरी पाडा येथून ९४ नागरीकांना एनडीआरएफ आणि पालिकेच्या अग्निशमन दलानं रेस्क्यू करुन सुरक्षितस्थळी स्थलांतरीत केलंय.
Continues below advertisement