Vasai Truck Rain Issue : रस्ता खचला, ट्रक अडकला! मुंबई - अहमदाबाद मार्गावर काय घडलं?

Continues below advertisement

पुणे : महाराष्ट्रात मान्सून दाखल (Monsoon Arrived in Maharashtra) झालाय ही एक मोठी गोष्ट आहे. मान्सून राज्यात दाखल झाला असून रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि सोलापूरपर्यंत मान्सून पोहोचलाय. या भागात पावसानं हजेरी लावलेली आहे. हवामानाचं चित्र मान्सूनच्या प्रवासासाठी (Monsoon) अनुकूल असल्याचं भारतीय हवामान विभागाच्या पुणे विभागाचे प्रमुख के.एस. होसाळीकर (K.S. Hosalikar) यांनी म्हटलं. शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, हवामान विभाग आणि कृषी विभागाच्या सल्ल्यानुसार विचारपूर्वक पेरणीचा निर्णय घ्यावा, असं होसाळीकर यांनी म्हटलं. 

पुढच्या तीन ते चार दिवसात मान्सून राज्याच्या विविध भागात पोहोचेल. त्यामध्ये मुंबईचा देखील समावेश असेल, असं होसाळीकर यांनी म्हटलं. कोकण, दक्षिण महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात पाऊस दिसत आहे. मान्सून सर्व राज्यात पोहोचण्यासाठी वाट पाहावी लागेल, असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. 

राज्यात रविवार आणि सोमवारी कोकणात काही ठिकाणी मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज वर्तवेल,असं के.एस. होसाळीकर यांनी म्हटलं. ते बीबीसी मराठी सोबत बोलत होते. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram