Palghar Suspicious boat : संशयास्पद बोट, बोटीवर पाकिस्तानी नागरिक नाही, बोट मालकाचा दावा

Continues below advertisement

Palghar Suspicious boat : संशयास्पद बोट, बोटीवर पाकिस्तानी नागरिक नाही, बोट मालकाचा दावा

Raigad Suspected Boat: रायगडच्या किनाऱ्याजवळ संशयास्पद बोटीबाबत (Raigad Suspected Boat) आता नवीन माहिती समोर आली आहे. मुंबई आणि पालघर किनारपट्टी पासून ४४ नौटीकल मैलावर तटरक्षक दलाने (Coast Guard) पकडलेल्या बोटीत कोणीही पाकिस्तानी खलाशी नाहीत, हा प्रकार गैरसमजातून झाला असल्याचा खुलासा या बोटीला अर्थसाहाय्य करणाऱ्या उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने केला आहे. आधी हाती आलेल्या माहितीनुसार, या बोटीत पाकिस्तानी नागरीक असल्याची माहिती होती. मात्र, त्याबाबत आता नवी माहिती समोर आली आहे.

'जलराणी' ही बोट उत्तन मधील बेन्हार जॉनी बुटी यांच्या मालकीची आहे. दोन वर्षांपूर्वी तिला उत्तन मच्छीमार विकास सहकारी संस्थेने ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मार्फत अर्थसाहाय्य केले आहे अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष लिओ कॉलासो यांनी दिली आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram