Palghar Pregnant Women : गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जाणारी गाडी चिखलात अडकली, महिलेचे हाल
abp majha web team
Updated at:
20 Aug 2022 10:13 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपालघरमधील एका गर्भवती महिलेला जीपमधून प्रसूतीसाठी नेत असताना रस्त्याच्या दुर्दशेमुळे वाहन चिखलात रुतलं... त्यानंतर तरुणांनी धक्का मारत हे वाहन पुढे पाठवलं... या घटनेमुळे पालघरमधील आरोग्यसेवा डळमळीत झाल्याचं पाहायला मिळालं... याबाबतचं वृत्त एबीपी माझानं दाखवल्यानंतर प्रशासनाला खडबडून जाग आलीय... काल संध्याकाळी नव्यानेच रुजू झालेले जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी गाव पाड्यांवर भेट देऊन पाहणी केली... त्याचबरबर ज्या ठेकेदारांनी हे रस्ते बनवलेत त्यांची आणि संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करुन कारवाईची ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिलीय...