Palghar MNS Worker Beat Doctor : मनसे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरेंची डॉक्टरला मारहाण ABP Majha

Palghar  MNS Worker Beat Doctor : मनसे पालघर जिल्हाध्यक्ष समीर मोरेंची डॉक्टरला मारहाण ABP Majha

मनसेचे पालघर ग्रामीण जिल्हाध्यक्ष समीर मोरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह रुग्णालयात जाऊन रुग्णालयाची तोडफोड करत एका डॉक्टरला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .सलग तिसऱ्या दिवशी मारहाण केल्याची माहिती

  स्वप्निल शिंदे असं या डॉक्टरचं नाव असून त्यांचं बोईसर परिसरात शिंदे रुग्णालय आहे . कोरोना काळातील पेंडिंग असलेल बिल मागत असल्याने समीर मोरे यांनीही बेदम मारहाण केल्याचा आरोप डॉक्टर कडून करण्यात आला असून या मारहाणीत डॉक्टरच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना गुजरात मधील वापी येथील एका रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आल आहे . मारहाणीचा हा व्हिडिओ रुग्णालयात लागलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून मारहाण आणि रुग्णालयाच्या तोडफोडी प्रकरणात बोईसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . सध्या बोईसर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून या मारहाणीनंतर बोईसर आणि परिसरातील डॉक्टर कडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जातोय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola