Abortion Rate Increased Buldhana : गर्भपाताच्या प्रमाणात मोठी वाढ, आरोग्य विभाग उदासीन ABP Majha

Continues below advertisement

Abortion Rate Increased Buldhana : गर्भपाताच्या प्रमाणात मोठी वाढ, आरोग्य विभाग उदासीन ABP Majha

बुलढाणा - बुलढाणा हा मातृत्व जिल्हा म्हणून ओळखला जातो. गेल्या दहा वर्षात या जिल्ह्यात मुलगा आणि मुलगी यातील जन्मदराची दरी ही 855 वरून कमी होऊन 939 इतकी कमी झाल्याने समाधान व्यक्त करत असतानाच आता गेल्या एक वर्षात म्हणजे 2022 मध्ये 3350 महिलांचा गर्भपात झाला किंवा केल्याची धक्कादायक माहिती समोर आलीय... यामुळे मुलगा आणि मुलगी यातील दरी व यांच्या जन्मदराचे प्रमाण वाढतं की काय अशी भीती व्यक्त होत आहे... गेल्या नऊ महिन्यात बारा आठवड्यांपर्यंत 3216 तर बारा आठवड्यांपेक्षा अधिक 134 महिलांचा गर्भपात विविध कारणांमुळे करण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram