Palghar ISIS : Al-Qaeda च्या संपर्कात असलेच्या संशयावरुन बोईसरमधून युवक ताब्यात, NIAची कारवाई
ISIS आणि अल कायद्याच्या संपर्कात असल्याच्या संशयावरून बोईसरमधील एका उच्चशिक्षित युवकाला NIA नं चौकशीसाठी ताब्यात घेतलंय... बोईसर पश्चिमेकडील अवध नगर परिसरातील सोमनाथ पॅराडाईज या सोसायटीतील शिवज्योती इमारतीतील हा युवक राहतो... त्याने हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलंय... काल मध्यरात्रीपासून NIA ने बोईसरमध्ये गुप्त पद्धतीने चौकशी सुरू केली होती... हा संशयित तरुण कुवेत, सौदी अरेबिया, केरळ या ठिकाणी मागील काही काळापासून राहत असून मागील दोन महिन्यांपूर्वीच तो बोईसरमध्ये वास्तव्यास आहे.