Palghar : बालमृत्यू रोखण्यात प्रशासनाला अपयश, अपुऱ्या आरोग्य सुविधा, उपचारात दिरंगाईमुळे मृत्यू
Continues below advertisement
पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अजूनही आरोग्यवस्थेची अनास्था दिसून येत असून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या पाच वर्षात बाल आणि माता मृत्यूमध्ये घट होत असली तरीही स्थिती कायम आहे. पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा बालमृत्यू आणि माता मृत्यूचा धक्कादायक आकडा समोर आला आहे. 2021-22 वर्षात तब्बल 294 बालमृत्यू आणि 20 माता मृत्यू तर 2022-23 मध्ये ऑक्टोबर पर्यंत 151 बालमृत्यू तर 7 माता मृत्यू झाल्याची माहिती उघड झाली आहे. यातील सर्वाधिक बालमृत्यू हे जव्हार, डहाणू आणि विक्रमगड या तालुक्यातील आहेत. या आकडेवारीमुळे पालघरमध्ये खळबळ उडाली आहे.
Continues below advertisement